बेस्ट बसच्या कंडक्टरकडून महिला प्रवाशाला मारहाण

या घटनेनंतर सहप्रवाशांनी बस  वाहकाला पकडून मुलुंड पोलीस ठाण्यात आणले.

Updated: Aug 25, 2018, 06:22 PM IST
बेस्ट बसच्या कंडक्टरकडून महिला प्रवाशाला मारहाण title=

मुंबई: मुलुंडमध्ये एका महिला प्रवाशाला बेस्ट बसच्या कंडक्टरने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही महिला ४९४ क्रमांकाच्या बेस्ट बसमधून काल रात्री ठाण्याहून भांडुपच्या दिशेने प्रवास करत होती. 

या महिलेचा आरोप होता की, बस कंडक्टर तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत होता . याला तिने विरोध करताच त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर सहप्रवाशांनी बस  वाहकाला पकडून मुलुंड पोलीस ठाण्यात आणले.

यावेळी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळटाळ केली. अखेर रंजना काऴे या समाजसेविकेने आवाज उठविताच मुलुंड पोलिसांनी बस कंडक्टर सुरेश गायकवाड याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.