'जो धोका देतो तो..' अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

'उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला हे बोलाण्यास संकोच करु नका' अमित शाह

Updated: Sep 5, 2022, 02:19 PM IST
'जो धोका देतो तो..' अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका title=

सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. जो राजकारणात धोका देतो त्याचं राजकारण यशस्वी होत नाही असं अमित शाह म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंनी विचारधारेशी घात केला, त्यांनी विश्वासघात केला हे बोलण्यात संकोच करू नका असं अमित शाह म्हणाले. 

अमित शाह यांची मुंबईत भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना मूळ हिंदुत्व विचारांची आहे. ही शिवसेना आपल्यासोबत असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत अमित शाह यांनी मनसेबाबत (MNS) मात्र कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. 

भाजपचं 'मिशन मुंबई'
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याचा मुख्य उद्देश हा मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Election 2022) रणनीती ठरवणं हाच आहे. त्यासाठी अमित शाह आज मुंबईत महत्त्वाच्या बैठका घेत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर मुंबई मनपा निवडणुकीसाठी बैठक होतेय. मुंबईतले भाजप नगरसेवक- आमदार बैठकीसाठी उपस्थित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडतेय. मुंबई आणि एमएमआर भागातल्या मनपांची रणनीती या बैठकीत ठवण्यात येत आहे. अमित शाह मुंबई आणि एमएमआरमधल्या आमदारांना आणि नगरसेवकांना अमित शाह मार्गदर्शन करत आहेत. 

त्यानंतर अमित शाह भाजप कोअर कमिटीशी बैठक करणार आहेत. भाजपने मुंबई मनपात 135 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबई मनपासह मुंबई परिसरातल्या महापालिका तसंच राज्यातल्या इतर महापालिकांमध्येही भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार भाजपने केलाय.