भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्यातील महत्वाचे नेते दिल्लीत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, तर आशिष शेलारांनी घेतली अमित शहा यांची भेट

Updated: Aug 6, 2021, 07:19 PM IST
भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्यातील महत्वाचे नेते दिल्लीत title=

मुंबई : भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. राज्यातले महत्त्वाचे नेते दिल्लीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीला गेले असून आणि देवेंद्र फडणवीसही उद्यापासून 4 दिवस दिल्लीत असतील. माजी मंत्री आशिष शेलार यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. 

तर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसही अमित शाह यांना भेटणार आहेत. महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री, खासदार आणि राज्यातल्या नेत्यांची दिल्लीत 9 तारखेला बैठक आहे. देशाचे पहिले सहकारमंत्री झाल्याबद्दल अमित शाह यांचा सत्कार करण्यात येणार असून राज्यातल्या सहकार क्षेत्रात असलेल्या समस्यांवर चर्चाही होणार आहे. 

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्लीला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांचा हा पूर्वनियोजित असला तरी मनसेसोबतच्या युतीबाबत दिल्लीवारीत चर्चा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.