विद्याविहारमध्ये 3 मजली इमारत कोसळली

 विद्याविहार पूर्व इथं ३ मजली इमारतीचा काही भाग कोसळला.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 12, 2018, 11:52 PM IST
विद्याविहारमध्ये 3 मजली इमारत कोसळली
File Photo

मुंबई : विद्याविहार पूर्व इथं ३ मजली इमारतीचा काही भाग कोसळला.

तिघेजण आतमध्ये अडकले होते. त्यातील दोघांना बाहेर काढण्यात यश आलंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्याविहार येथील तीन मजली इमारतीच्या जिन्याचा काहीसा भाग रात्री अकराच्या सुमारास कोसळला. यामध्ये तीन जण अडकल्याचे सांगण्यात येत असून दोघांना ढिगा-यातून बाहेर काढले आहे. दरम्यान घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. 

सविस्तरवृत्त लवकरच... 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close