हवामान खात्याचा चुकीचा अंदाज, मुख्यमंत्र्यांची नाराजी

हवामान खात्यानं वर्तवलेल्या चुकीच्या अंदाजामुळे ३० ऑगस्टला विनाकारण  शासकीय व्यवस्था ठप्प झाल्याचं आता पुढे आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

Updated: Sep 14, 2017, 10:32 AM IST
हवामान खात्याचा चुकीचा अंदाज, मुख्यमंत्र्यांची नाराजी

मुंबई : हवामान खात्यानं वर्तवलेल्या चुकीच्या अंदाजामुळे ३० ऑगस्टला विनाकारण  शासकीय व्यवस्था ठप्प झाल्याचं आता पुढे आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी नाराजीचं सविस्तर कारणही दिलं आहे. 29 ऑगस्टला झालेल्या विक्रमी पावसानंतर मुंबईची संपूर्ण यंत्रणा कोलडमली होती., त्यातच हवामान खात्यानं दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० तारखेलाही  मुसळधार पावसाचा अंदाज दिला. त्यामुळे  अत्यावश्यक सेवा मध्ये काम करणारे कर्मचारी वगळता  सर्वांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला.  

शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरवरून मुंबईतल्या सगळ्या शाळांना ३० तारखेला सुटी जाहीर केली. ३० तारखेला  बहुतांश कार्यालयांत शुकशुकाट होता. प्रत्यक्षात ३० तारखेला शहरात पावसाची हजेरी जेमतेमच होती. बऱ्याच ठिकाणी तर लख्ख सूर्यप्रकाशही होता. त्यामुळे शासकीय यंत्रणेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस अंदाज चुकल्यानं फुकट गेल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.