काँग्रेस संपलीय आणि त्याचं विसर्जन करण्याचं काम नाना पटोले करतायत, - भाजपाचा टोला

'काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद, नाना पटोलेंच्या आव्हानाला मुंबई काँग्रेसनेही प्रतिसाद दिला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे

Updated: Feb 14, 2022, 12:44 PM IST
काँग्रेस संपलीय आणि त्याचं विसर्जन करण्याचं काम नाना पटोले करतायत, - भाजपाचा टोला title=

मुंबई : महाराष्ट्रात भाजव विरुद्ध काँग्रेस (BJP vs Congress) असा संघर्ष पेटला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.  कॉंग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मुंबईतल्या सागर बंगल्यासमोर आंदोलन सुरू केलं. पण भाजपनेही कॉंग्रेसच्या आंदोलनाला आक्रमक उत्तर देत आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. 

दरम्यान, काँग्रेसच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनावर भाजप नेत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीका केली आहे.  मुंबईत अनेक ठिकाणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. आमच्या नेत्यांना अटक करणं, आज पोलिसांच्या झुंडशाहीचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे आम्ही त्याचा निषेध करतोय, असं शेलार यांनी म्हटलं. 

काँग्रेस संपलीय आणि त्याचं विसर्जन करण्याचं काम नाना पटोले करतायत, आणि म्हणून नाना पटोले यांच्या आव्हानाला मुंबई काँग्रेसनेही प्रतिसाद दिलेला नाही. मुंबई काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यातही विवाद आहे हे यावरुन स्पष्ट होतंय, असा टोला शेलार यांनी लगावला.

'काँग्रेसमुळे मुंबईकरांना त्रास'
मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागला, याचं सर्वस्वी पाप हे नाना पटोले आणि काँग्रेसचं आहे, आणि हे त्यांनी पहिल्यांदा केलेलं नाही, याआधी त्यांनी बैलगाडी मोर्चा, काँग्रेस स्थापनेच्या दिवशी केलेला मार्च, आणि या आज संपूर्ण दक्षिण मुंबईतील ट्रॅफिक, हे त्यांनी खोळंबून टाकलं, असे उद्योग नाना पटोले आणि काँग्रेसने केले आहेत. काँग्रेसला मुंबईकरांशी घेणंदेणं नाही, त्यातून अशा प्रकारच्या आंदोलनाची घोषणा करायची, पाच लोकंही मागे नाहीत, टायटाय फिशफिश काँग्रेसची झालेली आहे.

मुंबई काँग्रेसची २५ लोकंही नाना पटोले यांच्या आव्हानानंतर जमू नयेत, याचा अर्थ मुंबई काँग्रेस वेगळ्या दिशेला आणि नाना पटोले वेगळ्या दिशेला आहेत.  नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये विभाजन झालं आहे. अतुल लोंढे इथे पोहचले, तर सचिन सावंत घरीच होते, याचा अर्थ त्यांच्यातले वाद दिसतायत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह बघून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला, लोकशाही मार्गाने आपल्याला लढायचं आहे आणि काँग्रेसने महाराष्ट्राची केलेली बदनामी, काँग्रेसने केलेला कोरोनाचा सुपर स्प्रेडर म्हणून केलेला कार्यक्रम म्हणून काँग्रेसनेच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, आणि तोच आमचा कार्यक्रम असेल. 

'संजय राऊत यांनी कोणी गंभीरतेने घेत नाही'
संजय राऊत आजकाल जे बोलतायत त्याला ताळ आहे ना तम्य आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या लिखाणाच्या कॉलमचं नाव बदलून ना ताळ ना तम्य ठेवावं, त्यांना आता कोणी सिरिअसली घेत नाही. दुर्देवी चित्र आहे, की संजय राऊत हे महाविकास आघाडीपासून एकटे पडले आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:लाच शंका आहे की ते शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत की नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.