काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची तीव्र नाराजी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने औरंगाबादचा

Updated: Jan 6, 2021, 08:48 PM IST
 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची तीव्र नाराजी title=

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी ही नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा, यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही.

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अशा शब्दात ही नाराजी व्यक्त केली आहे.