मुंबईतील टॉवरमध्ये फ्लॅट आणि बरीच श्रीमंती... तुम्ही यांना पाहिलंय का?

Mumbai News : तुम्ही तर यांना सोशल मीडियावर फॉलो करत तर नाही ना? कारण शेअर बाजारातील यशाचा मंत्र देणारं हे जोडपं मुंबईच्या आलिशान फ्लॅटमधून करायचे काळा धंदा. 

Updated: Jun 21, 2023, 08:28 AM IST
मुंबईतील टॉवरमध्ये फ्लॅट आणि बरीच श्रीमंती... तुम्ही यांना पाहिलंय का? title=
crime news social media stock trading couple Ashish Kumar Mehta 300 crore drug racket Mumbai Police and Madhya Pradesh Police look out notice

Drug Racket : मुंबईची झगमग पाहून अनेकांचे डोळे चक्रावतात. इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आपलं भविष्य आजमावयाला येतात. असं म्हणतात इथे येणारा माणूस कधी उपाशी मरत नाही. बॉलिवूडपासून शेअर मार्केटपर्यंत या एका शहरात सगळं आहे. इथे अनेकांचं नशीब चमकलं आहे. तुंटपुजे पैसे घेऊन आलेले अनेक लोक इथे आज आलिशान घरात राहतं आहेत. पण या चमकणाऱ्या मुंबईतील अजून एक सत्य आहे ते म्हणजे इथली गुन्हेगारी नगरी. मुंबईची ही काळा बाजून अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवते. 

आजकाल सोशल मीडियाचा वापर इतक्या वाढला आहे की, त्याशिवाय जगणं जणू काही मुश्लिक आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. या सोशल मीडियाच्या जगात प्रत्येक जण वावरत आहे. पैसा खर्च न करता एका रात्रीत लोक इथे प्रसिद्धी सोबत मालामाल होतं आहेत. 

असं एक कपल सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर मार्केटमधील यशाचं गुरुमंत्र देतो. कदाचित तुम्ही पण या कपलला तुमच्या इन्स्टाग्रामवर फॉलो केलं असेल. सोशल मीडियावरील या कपलच्या मागावर मुंबईसह मध्य प्रदेशाची पोलीस आहे. 

मुंबईमध्ये पॉश टॉवरमध्ये आलिशान फ्लॅट आणि गडगंज श्रीमंती...डोळे दिपवणारं यशामागे एक काळ सत्य समोर आलं आहे. आशिष कुमार मेहता आणि त्याची पत्नी शिवानीला मध्य प्रदेश पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर जारी केलंय. या जोडप्यावर अमली पदार्थाच्या रॅकेटशी संबंध असल्याचा आरोप आहे.  (crime news social media stock trading couple Ashish Kumar Mehta 300 crore drug racket Mumbai Police and Madhya Pradesh Police look out notice)

ठाण्याच्या मिरारोडमधील एका संशयित ड्रग्ज विक्रेत्याची चौकशी सुरु असताना हा गौप्यस्फोट झाला आहे. त्या संशयित व्यक्तीने 300 कोटी रुपयांच्या रॅकेटचं मास्टरमाईंड असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या माहितीनंतर मध्य प्रदेश पोलीस त्यांना अटक करण्यासाठी आलं खरं पण त्यापूर्वीच या जोडप्याने भारत सोडला. 

आता मुंबई पोलीस आणि मध्य प्रदेश पोलीस या जोडप्याला शोधण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. या जोडप्याचा अनेक रॅकेट्सशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असल्याने यांना गजाआड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ड्रग्स रॅकेटसोबतच पॉन्झी स्कीम, डिजिटल करन्सी या प्रकरणात या जोडप्याचा हात असल्याचं पोलिसांना संशय आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका आलिशान टॉवरमध्ये हे जोडप राहायचं, पोलीस तिथे पोहोचली तर त्यांना घराला कुपूल मिळालं. 

दरम्यान दुसरीकडे आपल्या अशिलांना फसवलं जात असल्याचा दावा या दोघांच्या वकिलांनी केला आहे. जर असं आहे तर ते देश सोडून का निघून गेले असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या दोघांच्या मागावर आठ जणांची टीम 16 जूनला मध्य प्रदेशातून मुंबईला पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपं 174 कोटी घेऊन देश सोडण्यात यशस्वी झाले आहेत.