'सांगताना आनंद होतोय', पेट्रोलनंतर डिझेलही ४ रूपयांनी स्वस्त

परिणामी जनतेमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. 

Updated: Oct 5, 2018, 09:18 PM IST
'सांगताना आनंद होतोय', पेट्रोलनंतर डिझेलही ४ रूपयांनी स्वस्त title=

मुंबई: महाराष्ट्रात पेट्रोलपाठोपाठ डिझेलचे दर ४ रुपये ६ पैशांनी कमी झाले आहेत. राज्य सरकारकडून नुकतेच पेट्रोलवरील कर कमी करण्यात आले होते. त्यानंतर आता डिझेलवरील करांमध्ये कपात केल्याने डिझेल तब्बल चार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. डिझेलच्या दरात घट झाली आहे, हे सांगताना आनंद वाटत आहे. केंद्र सरकारने डिझेलच्या दरात एका लिटरमागे २.५० रुपयांची कपात केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही यामध्ये १ रुपयांची कपात करण्याचे ठरवले. तसेच ५६ पैसे कर कपातीचाही निर्णय घेतला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेली अनुक्रमे २.५० रूपये आणि १.५६ रूपये अशी मिळून डिझेलची किंमत प्रतिलिटर ४.०६ रूपयांनी कमी झाल्याचे फडणवीसांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने सातत्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ होत होती. परिणामी जनतेमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. अखेर  सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने इंधनाच्या दरात अडीच रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती.