बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आलाय. ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 

Updated: Nov 2, 2018, 10:41 PM IST
बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर  title=

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना ५,५०० रूपयांचा बोनस जाहीर करण्यात आलाय. ४० हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त यांच्यातल्या वाटाघाटीनंतर हा बोनस जाहीर करण्यात आलाय. 

आर्थिक स्थिती ढासळलेली असल्यामुळे बेस्टला बोनस मिळण्याची शक्यता कमीच होती. मागच्या वर्षी दिलेला बोनस नंतर पगारातून वळता करण्यात आला होता. मात्र यावर्षी बोनस कापून घेतला जाणार नाही. या बोनसमुळे २५ कोटींचा बोजा पडणार आहे.