'व्हायरल इन्फेक्शन' रोखण्यासाठी काय काळजी घ्याल ? जाणून घ्या

बदललेलं वातावरण आणि वाढत प्रदूषण यामुळे दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. 

Updated: Oct 27, 2019, 09:36 PM IST
'व्हायरल इन्फेक्शन' रोखण्यासाठी काय काळजी घ्याल ? जाणून घ्या  title=

बागेश्री कानडे झी २४ तास मुंबई : दिवाळीचा सण आनंद, उत्साह घेऊन येतो. खूप साऱ्या मिठाई आणि फराळासोबत फटाकेही येतात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेच आहे. कारण यंदा दिवाळी आली तरी पाऊस माघारी जाण्याचे नाव घेत नाहीय. बदललेलं वातावरण आणि वाढत प्रदूषण यामुळे दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. दिवाळीतले हे आजार टाळण्यासाठी डॉ. हेमंत चव्हाण यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

यंदा फक्त दिवाळीच्या फटाक्यांचं प्रदूषण नाही तर त्याच्या जोडीला पाऊसही मुक्कामी आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड मोठा केमिकल लोचा झालाय. सकाळी पाऊस दुपारी उन आणि रात्री थंडी असो गोंधळ सध्या सुरू आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरू आहे.... त्यातच दिवाळी आल्यानं फटाक्यांचं प्रदूषण वाढलंय. प्रदूषण आणि दमटपणा यामुळे प्रचंड केमिकल लोचा झालाय, तो आजारपण वाढवणारा ठरणार आहे.  

सध्या साथीच्या आजारात वाढ होतेय. ताप, सर्दी खोकला, घसादुखी आणि ताप अशा साथीच्या आजारांध्ये वाढ होतेय. नाक, स्वरयंत्र आणि घशामध्ये 'व्हायरल इन्फेक्शन' वाढलंय

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अस्थमा असलेल्या लहान मुलांना  फटाक्यापासून दूर ठेवा असा सल्ला डॉ. हेमंत चव्हाण यांनी दिला आहे. तसेच नाक, स्वरयंत्र आणि घसा या भागात जीवाणूंचा संसर्ग झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा असेही ते सांगतात. त्यामुळे दिवाळी नक्की साजरी करा पण आरोग्याकडे आधी काळजी घ्या असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.