ड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीने मोठी कारवाई केलीय.  

Updated: Sep 26, 2020, 10:57 PM IST
ड्रग्ज कनेक्शन : दीपिका, सारासह पाच जणांचे मोबाईल जप्त; २० जणांना अटक  title=

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीने मोठी कारवाई केलीय. चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झालेल्या दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांचे मोबाईल फोन एनसीबीने जप्त केलेत. त्याशिवाय रकूल प्रीतसिंह, सिमोन खंबाटा, करिष्मा प्रकाश आणि जया साहा यांचेही मोबाईल फोन एनसीबीने जप्त केलेत. 

या मोबाईल फोनमधील डाटाच्या आधारे ड्रग्ज प्रकरणात गुंतलेल्या बड्या नावांचाही खुलासा होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर डिलीट केलेला मोबाईलमधील डाटा देखील परत मिळवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिलीय. याप्रकरणी आतापर्यंत ३५ जणांची चौकशी झाली आहे. तर २० जणांना अटक करण्यात आली.

ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी करण्यात आली. रकुल प्रीतसिंह (Rakul Preet Singh) हिच्या चौकशीत दीपिकाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर दीपिकाला एनसीबीने  Narcotics Control Bureau (NCB) चौकशीला बोलावले. तिची चौकशी आज संपली. तिला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता आहे. चौकशीनंतर दीपिका एनसीबी कार्यालयातून घरी रवाना (Deepika Padukone) झाली. मात्र दीपिकाला पुन्हा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी तिघा आघाडीच्या अभिनेत्रींची शनिवारी एनसीबीनं कसून चौकशी केली. दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान अशा तिघींची एनसीबीच्या एसआयटीतील पाच सदस्यीय पथकानं चौकशी केली. दीपिका आणि करिश्मा प्रकाश या दोघींची एनसीबी गेस्ट हाऊसवर चौकशी करण्यात आली. धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसाद याला एनसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी एनसीबीने क्षितीजची जवळपास २४ तास चौकशी केली होती. 

दरम्यान, एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येतेय. २०१७ चे 'ते ' व्हॉट्सअप चॅट झाले होते, अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचेही समोर येत आहे.

तसेच अभिनेत्री सारा अली खानची देखील चौकशी करण्यात आली. श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. सुशांतसिंह राजपूतशी केदारनाथच्या शुटींग दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा अशी कबुली साराने दिली.