सुशांत प्रकरण: ड्रग्सच्या दुनियेत 'हे' ३ मोठे हात, ईडी गौरव आर्याकडून माहिती घेणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत.  

Updated: Aug 31, 2020, 12:15 PM IST
सुशांत प्रकरण: ड्रग्सच्या दुनियेत 'हे' ३ मोठे हात, ईडी गौरव आर्याकडून माहिती घेणार  title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. ड्रग्सबाबत गौरव आर्यासोबतचं रिया चक्रवर्तीचं व्हॉट्सअप चॅट व्हायरल झालं आहे. गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर आज त्याची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. रिया ड्रग्स कनेक्शनवर ईडी गौरवला प्रश्न विचारू शकते. आता या प्रकरणात ड्रग्स विश्वातील अन्य तिघांचे नाव देखील समोर आले आहे. कपिल झवेरी , कैलाश राजपूत, अबू असलम आझमी हे तीन मोठे हात समोर आले आहे. 

ईडी गौरव आर्याला विचारू शकते 'हे' प्रश्न 
- कपिल झवेरी ला तुम्ही केव्हा पासून ओळखता. 
- तुम्ही दोघांनी गोव्यात कुठे गुंतवणूक केली आहे?
- कोणत्या ड्रग्स प्रकरणात कपिल गोव्यात पकडला गेला आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात कपिलने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्याकडे अनेक नशेचे पदार्थ मिळाल्यामुळे त्याला गोवा पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली होती. कपिल झवेरी नुकताच जामिनावर तुरूंगातून बाहेर आला आहे. 

ड्रग्स विश्वातील आझमी हा मुंबईत राहतो. त्याची आणि कैलाश राजपूतची मैत्री आहे. महाराष्ट्र आणि मुंबईशिवाय कैलास आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा प्रमुख माफिया आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चौकशीमध्ये गौरवला या अन्य दोघांबद्दल देखील विचारणा केली जावू शकते.