महत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

Maharashtra Political Crisis :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.  

Updated: Jun 30, 2022, 08:17 AM IST
महत्वाची घडामोड : एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार title=

मुंबई : Maharashtra Political Crisis : बुधवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर राज्यातील सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे. आज भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेत बंड केलेले  एकनाथ शिंदे आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आधी सूरत गाठले. त्यानंतर सूरतवरुन थेट गुवाहाटीत ठाण मांडले. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे म्हटले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. त्यानंतर शिंदे समर्थक आमदारांसह गोव्यात दाखल झालेत. आता गोव्यातून शिंदे गट मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

एकनाथ शिंदे आज देवेंद्र फडणवीस यांची भेट सागर बंगल्यावर घेणार आहेत. गोव्यातून मुंबईत आल्यानंतर शिंदे-फडणवीस भेट होणार आहे. पुढील राजकीय सत्ता समीकरणाबाबत चर्चा करणार आहेत. एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह दुपारपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 30 जून  होणाऱ्या फ्लोअर टेस्टच्या आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण ठाकरे पायउतार झाल्यावर महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्यास सांगितले आहे.