'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

Rohit Pawar : ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 24, 2024, 11:01 AM IST
'बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा' म्हणत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला title=
Exclusive Rohit Pawar on Ed Enquiry and support from ncp chief sharad pawar latest news

Rohit Pawar Ed Enquiry : बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) ईडीकडून (ED) चौकशी सुरु आहे. यावेळी पवार गटाकडून मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर शक्तिप्रदर्शन करण्यात येतं आहे. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना साथ देण्यासाठी ईडी कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. यावेळी रोहित पवारांच्या हातात एक फाईल होती. त्यावर महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांचं, समाजसुधारकांचं फोटो दिसून आलेत. त्यावर विचारांचा वारसा असेही लिहिलंल आढळलं. ईडी ऑफिसला जाण्यापूर्वी रोहित पवार पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बापमाणूस भक्कमपणे पाठीशी उभा असं म्हणत त्यांनी बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांना टोला मारला आहे. (Exclusive Rohit Pawar on Ed Enquiry and support from ncp chief sharad pawar latest news )

'या बच्चाला दिशा देण्यासाठी साहेब इथे' 

ईडी ऑफिसला जाण्यापूर्वी रोहित पवार झी २४ तासच्या रिपोर्ट सागर कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांना टोमणा मारला. ते म्हणाले की, 'या बच्चाला दिशा देण्यासाठी साहेब इथे'. त्याच्यावेळी ते म्हणाले की, 'मी एवढचं सांगेन अधिकारी त्यांचं काम करत असतात त्यांनी जी कागदपत्रं मागवली ती मी पूर्वीच दिली आहे. पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणार आहे. यामागे काय विचार? कुठली शक्ती? हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र आम्ही एका बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहोत म्हणून कदाचित ही कारवाई झाली असणार आहे.'

आत्तापर्यंत जी माहिती मागवली आहे तीच माहिती आम्ही सीआयडी, ईडब्ल्यूओ आणि ईडीला देखील दिल्याचं त्यांनी पुन्हा सांगितलं. आता चौकशी दरम्यान ईडीचे अधिकारी जे काही विचारतील त्याची उत्तरं मी देणार आहे. चुक केली नाही तर डर कशाला? 

चौकशीनंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा लढण्यासाठी तयार राहू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान रोहित पवारांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी खुद्द शरद पवार मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित आहेत. यावेळी रोहित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पाया पडले. दरम्यान ईडी चौकशीला जाण्यापूर्वी विधानभवनात जाऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोक ठेऊन नमस्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं असंही त्यांनी सांगितलं. 

सत्याचा विजय होणार - सुप्रिया सुळे

सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा असून मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे, अशा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.