'Axis बँकप्रकरणी फडणवीसांवरील आरोप दुर्दैवी'

अमृता फडणवीस यांचा खुलासा...

Updated: Mar 7, 2020, 09:01 PM IST
'Axis बँकप्रकरणी फडणवीसांवरील आरोप दुर्दैवी' title=
फाईल फोटो

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन खाती अॅक्सिस बँकेत वळवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणं दुर्दैवी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातच हा निर्णय झाला होता, असा खुलासा अमृता फडणवीस यांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.

मी २००३पासून बँकमध्ये कर्मचारी आहे. देवेंद्र फडणवीसांच्या स्पॉटलेस चारित्र्यांमध्ये कोणत्याही भ्रष्टाचाराचे डाग मिळत नसल्याने माझ्यावर आरोप होत आहेत. मी सामान्य व्यक्ती आहे. मी खूप मेहनत केली आहे. बँकेने मला खूप आदर दिला आहे. माझ्या नोकरीमुळे मला आदर असल्याचं त्या म्हणाल्या.

आरोप करणाऱ्यांकडे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काहीच हाती आलं नाही, त्यांच्याकडे काही उरलं नसल्याने मला भ्रष्टाचाराशी जोडलं जात असल्याची खंत अमृता फडणवीस यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केली आहे.