चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीच्या गॅस टाकीला आग

चेंबूर माहुल इथे बीपीसीएल कंपनीच्या गॅस टाकीला आग लागली.

Updated: Aug 8, 2018, 03:58 PM IST
चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीच्या गॅस टाकीला आग  title=

मुंबई : चेंबूरला माहुल परिसरात बीपीसीएल कंपनीच्या गॅस टाकीला भीषण आग लागलीय. सुमारे पावणेतीनच्या सुमारास इथे झालेल्या स्फोटामुळे मोठी आग लागलीय. बीपीसीएल कंपनीचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मुंबई अग्निशमन दलाची ८ फायर इंजिनही अग्निशमनासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.