नालासोपारा येथे एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

नालासोपारा (Nalasopara) आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या (commit suicide at Nalasopara) केल्याची धक्कादायक घटना घडली.  

Updated: Dec 19, 2020, 07:00 PM IST
नालासोपारा येथे एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या  title=

वसई : नालासोपारा (Nalasopara) आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या (commit suicide at Nalasopara) केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या आत्महत्येच्या प्रयत्नात १० वर्षाच्या मुलीचा जीव वाचला आहे. सकाळी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जीव वाचलेल्या १० वर्षांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आई, भाऊ आणि बहीण यांचा मृत्यू झाला.

नालासोपारा-वसई रेल्वे स्थानकादरम्यान वसई दिशेने जाणाऱ्या मालगाडीखाली आजीसह तीन मुलांनी झेप घेतली. एकाच कुटुंबातील आई, मुलगा, मुलगी आणि १० वर्षांच्या नातीसह आर्थिक चणचणीला कंटाळून आत्महत्या केली. याबाबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर मृतांचे मृतदेह हमालांच्या मदतीने स्ट्रेचरवरून स्थानकात आणण्यात आले. 

या अपघातात सुदैवाने १० वर्षीय मुलीचा जीव बचावला आहे, ती बेशुद्ध अवस्थेत सापडली आहे. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. वसई रेल्वे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.