Gold Sliver Rates Today: चैत्र नवरात्रीपूर्वी सोनं-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजच्या किमती काय?

Gold and Silver Price Today: सध्या सणासुदीचा मोहोल आहे आणि सगळीकडे लग्नसराईही (Wedding Season) दिमाखात सुरू आहे. परंतु सोनं आणि चांदीच्या (Gold and Sliver Rates) दरात मात्र लक्षणीय वाढ दिसते आहे. सोन्याच्या दरात काही दिवसांपूर्वी घसरण पाहायला मिळाली होती परंतु आता सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते आहे आणि त्याचसोबतच चांदीचे दर (Sliver for 1 Kg) घसरताना दिसत आहेत. 

Updated: Mar 11, 2023, 11:42 AM IST
Gold Sliver Rates Today: चैत्र नवरात्रीपूर्वी सोनं-चांदीच्या किमतीत बदल, जाणून घ्या आजच्या किमती काय? title=
gold and sliver price today know the latest rates of gold and sliver price in your city in wedding and festive season

Gold and Silver Price Today in Maharashtra: सध्या लग्नाचा माहोल आहे. सगळीकडेच लग्नसराईची तयारी सरू आहे. त्यातच ग्राहकांची झुंबड लागलेली असते ते म्हणजे सोनं खरेदी (Gold Price Today) करण्यासाठी. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या (Gold Price Hike) खरेदीत लक्षणीय वाढ होईल त्यातून लोकं ही सोन्याकडे गुंतवणूकच्या (Gold Investment) दृष्टीनंही खरेदी करताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सोन्याच्या किंमतीमध्येही लक्षणीय वाढ झालेल्या दिसणार आहे. त्यातून लवकरच हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्यालाही (Gudipadwa) सुरूवात होईल. त्यासाठीही अनेकांची लगबग ऐव्हानाच सुरू झाली असेल. सणा-सुदीला आणि लग्नसराईच्या या काळात आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ (Sliver Rates) पाहायला दिसून येते आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया आजचे दर काय आहेत? (gold and sliver price today know the latest rates of gold and sliver price in your city in wedding and festive season)

10 ग्रॅमच्या हिशोबानं 24 कॅरेट (Pure Gold) सोन्याचे दर हे 56,110 रूपये प्रति 10 ग्रॅमनं वाढले आहेत. तर 22 कॅरेट (Standard Gold) सोनं हे 51,450 रूपये प्रति 10 ग्रॅमनं वाढले आहेत. तसेच चांदीच्या किमती या 67,300 रूपये प्रति 1 किलोग्रॅमच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सोन्याचे दर हे वाढल्याचे समजते आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे हा विषय सध्या ग्राहकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. या महिन्यापासून सोन्याच्या किमती या वाढताना दिसत आहेत. सर्वत्र 24 कॅरेटची खरेदी होते त्यामुळे प्रति 10 ग्रॅमच्या दरानं सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 

गेल्या 10 दिवसात सोन्याच्या दरात चढउतार- 

महिन्याच्या सुरूवातीला सोन्याचा दर हा 56,450 रूपये इतका होता. त्यानंतर हाच दर शंभर रूपयांनी वाढत गेला. 7 मार्चला सोन्याचा दर दोनशे रूपयांनी घसरलाही होता. 56,450 रूपयांवरून वाढून तो 56,350 रूपये इतका होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो 300 रूपयांनी वधारला. त्यानंतर सोन्याच्या दरात (Gold Rates in Mumbai) लक्षणीय घट होत काल सोन्याचे दर हे 56,070 वर आहे. अनेक भागांमध्ये यातही वाढ झाली आहे. 

हेही वाचा - Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

काय सांगतायेत चांदीचे दर? 

काल चांदीचे दर हे 67,300 रूपये प्रति किलोग्रॅम होते. गेल्या काही दिवसांमध्ये चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. महिन्याच्या सुरूवातीपासून चांदीचा दर हा 70,200 रूपये प्रति किलोग्रॅमच्या (Silver Rates in Mumbai) वर होता. 7 मार्च रोजी ही किंमत घसरून 67,500 रूपये प्रति किलोग्रॅमच्या आसपास आली होती. आता चांदीच्या दरातही थोड्याफार रूपयांनी वाढ होते आहे. सोने चांदीच्या किंमतीमध्ये 6-7-8 मार्च या दिवसांत मोठे बदल पाहायला मिळाले.