घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.  

Updated: Aug 16, 2019, 11:19 AM IST
घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकारने उचलले महत्वाचे पाऊल title=
संग्रहित छाया

मुंबई : घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र आणि राज्याच्या गृहयोजनेत सोडतीमध्ये घर मिळण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी गृहयोजनेत एकदा घर मिळालेल्या व्यक्तीस त्यानंतर राज्यातल्या कुठल्याही योजनेत अर्ज करता येणार नाही. त्यासाठी सरकारी गृहनिर्माण धोरणात बदल करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. 

म्हाडा प्राधिकरणातर्फे जाहीर केल्या जाणाऱ्या घरांच्या सोडतीतला विजेता अन्य विभागातल्या सोडतीत सहभागी होऊ शकतात. त्याठिकाणी विजेता ठरल्यास संबंधिकाकडे दोन घरांची मालकी राहते. या तरतुदीमुळे गरजवंतास घर मिळत नाही. हाच मुद्दा लक्षात घेऊन सरकारी गृहयोजनेत एका व्यक्तीस एकच घर देण्याचा निर्णय अंमलात आणला जाणार असल्याची माहिती आहे. 
सरकारचा हा निर्णय अमलात आला तर म्हाडासह राज्यातील घरांच्या योजनेत मोठ्याप्रमाणात गरजवंतांना घरे मिळण्याचा दावा केला जात आहे.

तर दुसरीकडे यामुळे वादंगही होण्याची चिन्हे आहेत. याआधी अनेकांनी मुंबईत म्हडाचे घर लागलेल्यांना नवी मुंबईतही सीडकोची घरे मिळाली आहेत. तसेच राज्यातही काही ठिकाणी सरकारी योजनेअंतर्गत घरे मिळाली आहेत. त्यामुळे एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी घरे घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा निर्णय झाला तर याला चाप बसणार आहे.