'कमला मिल' प्रकरणातील आरोपीच्या भेटीला हरभजन

क्रिकेटपटू हरभजन सिंहनं आज कमला मिलच्या आगीप्रकरणी आरोपी असणाऱ्या विशाल कारियाची भेट घेतली. 

Updated: Jan 19, 2018, 10:46 AM IST
'कमला मिल' प्रकरणातील आरोपीच्या भेटीला हरभजन title=

मुंबई : क्रिकेटपटू हरभजन सिंहनं आज कमला मिलच्या आगीप्रकरणी आरोपी असणाऱ्या विशाल कारियाची भेट घेतली. 

विशाल कारियावर आरोपींना लपण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. रात्री उशिरा हरभजन सिंह कारियाचं घर असणाऱ्या रिव्हिएअरा अपार्टमेंटमधून बाहेर आला. 

मीडियाच्या कॅमेरापासून वाचण्याचा हरभजनकडून आटोकाट प्रयत्न केला. पण त्यात त्याला फारसं यश आलं नाही. 

विशाल कारिया हा एक बुकी असून त्याचे अनेक क्रिकेटर आणि हॉटेल मालकांशी संबंध असल्याचं याआधीही पुढे आलं आहे. 

कारियाला ९ जानेवारीला अटक करण्यात आली तर १५ तारखेला संध्याकाळी भोईवाडा कोर्टातून त्याला जामीन मिळाला आहे.