नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, ईडीची कुर्ल्यात छापेमारी

आज सकाळपासूनच कुर्ल्यात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे  

Updated: Mar 22, 2022, 11:55 AM IST
नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, ईडीची कुर्ल्यात छापेमारी title=

मुंबई : मनी लॉन्ड्रींग (Money Laundring) प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.  मुंबईतील कुर्ला (Kurla) परिसरातल्या गोवावाला कम्पाऊंडवर ईडीने (ED) छापा टाकलाय. नवाब मलिकांच्या मनी लाँडरिंगप्रकरणात ईडीने ही छापेमारी केलीय. पाच ते सहा अधिकाऱ्यांची टीम सीआरपीएफसह इथे दाखल झाली आहे.

गोवावाल कम्पाऊंड जवळच्या भूखंडाप्रकरणीच नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी ईडीने आज सकाळपासून ही छापेमारी सुरु केली आहे. 

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तीकून नवाब मलिक यांनी भूखंड खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (Nawab Malik's judicial custody) 
डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक यांना दिलासा देण्यास  न्यायालयाने नकार दिला आहे. केंद्रीय तपासयंत्रणांची कारवाई कायद्यानुसारच असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने इडी कारवाईविरोधातील मलिकांची याचिका फेटाळली होती. तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.

दरम्यान, मलिक यांच्या काही मागण्या न्यायालयाने मान्य केल्या आहेत. मलिक यांना बेड, गादी आणि खुर्ची मिळणार आहेत. सत्र न्यायालयाने मलिक यांच्या मागणीच्या या तीन गोष्टी मंजूर केल्या केल्या आहेत. तसेच हायपर टेन्शन आणि डायबेटीस असल्याने कमी मिठाचे जेवण मिळावे यासाठी घरचे जेवण मिळावे, अशी विनंती मलिक यांच्याकडून वकिलांनी केली, यावर मेडिकल रिपोर्ट पाहून न्यायालय नंतर निर्णय देणार आहे.