Election results 2019 : भाजपाच्या परतीची चिन्हं दिसताच शेअर बाजार वधारला

उसळी मारत गाठला 'इतका' आकडा... 

Updated: May 23, 2019, 10:56 AM IST
Election results 2019 : भाजपाच्या परतीची चिन्हं दिसताच शेअर बाजार वधारला title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : lok sabha election 2019 सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या निवड़णुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण देशात राजकीय वातावरणाला उधाण आलं. कोण जिंकणार, कोण हरणार याविषयीच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

पहिल्या सत्रातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता याचे थेट पडसाद अर्थव्यवस्थेवही होताना दिसत आहेत. सेंसेक्सवरही भाजपाची जादू पाहायला मिळत आहे. पहिल्या सत्रातील कल हाती येताच आणि भाजपच्या पारड्यात आघाडीचे जास्त आकडे दिसताच सेंसेक्सने ६०० अंकांची उसळी घेतली होती. दरम्यान सध्या हाती येणाऱ्या माहितीनुसार सेंसेक्सने ४० हजारांचा आकडा गाठला आहे. पहिल्यांदाच सेंसेक्समध्ये ही अशा प्रकारची विक्रमी उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे य़ेत्या काळात निवडणूक निकालांचे थेट पडसाद सेंसेक्सवरही दिसत असल्याचं नाकारता येत नाही.

संपूर्ण दिवसभरात सेंसेक्स आणि निफ्टीच्या आकड्यावर अनेकांच्या नरा राहणार आहेत. निफ्टीचा हा आकडा जवळपास १२ हजारांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.