जीएसटी करप्रणालीविरोधात लॉटरी विक्रेत्यांचा बंद

जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे अस सांगत महाराष्ट्रभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी 20 आणि 21 ऑगस्ट रोजी बंद पाळला आहे.

Updated: Aug 20, 2017, 07:39 PM IST
जीएसटी करप्रणालीविरोधात लॉटरी विक्रेत्यांचा बंद  title=

मुंबई : जीएसटीमुळे लॉटरी व्यवसाय धोक्यात आला आहे अस सांगत महाराष्ट्रभरातल्या लॉटरी विक्रेत्यांनी 20 आणि 21 ऑगस्ट रोजी बंद पाळला आहे. याच विषयाला घेऊन लॉटरी बचाव महाकृती समिती मार्फत 21 तारखेला मुंबईतल्या आझाद मैदानात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

एक देश एक कर आहे मग महाराष्ट्र सरकारची लॉटरी महाराष्ट्रात विकली तर 12 टक्के जीएसटी आणि इतर राज्यात विकली तर 28 टक्के जीए टी अशी विभागणी का? असा सवाल लॉटरी विक्रेत्यांनी सरकारसमोर उपस्थित केला आहे. जीएसटीला आपला विरोध नाही मात्र देशभरात सरसकट लॉटरी व्यवसायावर 12 टक्के जीएसटी आकारली जावी अशी मागणी लॉटरी व्यावसायिकांची आहे.