Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पातील महत्वाच्या ११ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.  

Updated: Mar 6, 2020, 01:25 PM IST
Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पातील महत्वाच्या ११ मोठ्या घोषणा title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी निरनिराळ्या घोषणा केल्या. यात ११ महत्वाच्या घोषणा करण्यात आला आहेत.

८० टक्के स्थानिकांना नोकऱ्या, कायदा करणार

अर्थसंकल्पात उद्योग विभाग

पाहा काय केल्या मोठ्या घोषणा?

१. राज्यात पेट्रोल महागणार, पेट्रोलवर राज्य सरकारने १ रूपया व्हॅट वाढवला, घरखरेदीत मुद्रांक शुल्कात २ वर्षांसाठी १ टक्के सवलत

२. दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, वरील रक्कम भरल्यानंतर सरकार २ लाखांचं कर्ज माफ करणार, अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

३. फडणवीस सरकारची जलशिवार योजना रद्द करून नवी मुख्यमंत्री जलसंधारण योजना, जलसंपदा विभागासाठी १०,२३५ कोटींची तरतूद

४. संपूर्ण ऊस शेती येत्या ३ ते ४ वर्षात ठिबक सिंचनाखाली आणणार, पिकविम्यासाठी २०३४ कोटी, कृषी पशूसंवर्धन दुग्धविकासासाठी ३२५४ कोटी रूपयांची तरतूद

५. आमदार निधीत अजित पवारांनी पुन्हा केली वाढ, आमदार निधी २ कोटीहून तीन कोटींवर, यापूर्वी अजित पवारांनीच दीड कोटीवरून २ कोटींवर नेला होता निधी

६. बहुजन कल्याण विकासासाठी अर्थसंकल्पात ३ हजार कोटी, सारथी योजनेसाठी ५० कोटींचा निधी

७. कोकणच्या विकासासाठी ठाकरे सरकारचे प्राध्यान्य, रेवत ते रेड्डी महामार्गावर खाडीपूल, काँक्रिटीकरण, ३ वर्षात काम पूर्ण करणार

८. पुणे शहराबाहेर १७० कोटींचा रिंगरोड, १२०० कोटींचा निधी सरकारकडून, अजित पवारांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे अभिनंदन

९. गावोगावी नव्या कोऱ्या एसटी बसेस धावणार, महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बस बदलणार. १६०० नव्या बसची खरेदी होणार, गावोगावी वायफाययुक्त अत्याधुनिक बस धावणार

१०. महिला आणि जेंडर बजेट प्रथमच, प्रत्येक जिल्हा पोलीस मुख्यालयात महिला पोलीस ठाणे उभारणार, १००० कोटींपर्यंतची खरेदी महिला बचत गटांकडून, शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करणार

११. मुंबईच्या पर्यटनात मोलाची भर पडणार, हाजी अली विकास आराखडा, वरळीत आकर्षक मत्स्यालय उभारणार, नवी मुंबईत महाराष्ट्र भवन, पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागासाठी १ हजार ४०० कोटींचा निधी