अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी

 मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशीनिमित्त ५ सप्टेंबर २०१७ रोजी मंगळवारी राज्य शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 1, 2017, 04:15 PM IST
अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी title=

 मुंबई :  मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना अनंत चतुर्दशीनिमित्त ५ सप्टेंबर २०१७ रोजी मंगळवारी राज्य शासनाने स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
 
अनंत चतुर्दशीनिमित्त प्रतिवर्षी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी देण्याचे १९९६  च्या शासन परिपत्रकान्वये मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता शासकीय कर्मचारी अनंत चतुर्दशीचा आनंद आपल्या कुटुंबियांसोबत घेऊ शकतात. यंदा गणेशोत्सव हा १२ दिवसांचा होता. त्यामुळे ११ दिवसांचे बाप्पा एक दिवस अधिक आपल्या भक्तांनासोबत राहिले होते. मंगळवारी वेगवेगळ्या मंडळातील आणि काही घरगुती बाप्पांना वाजत - गाजत निरोप दिला जाणार आहे. 

यंदा या १२ दिवसांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. गौरीच्या आगमनासोबत मुंबई आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर दोन दिवसांची पावसाने विश्रांती घेतली खरी. पण या दिवसांत पावसाने मुंबईकरांना काहीशा प्रमाणात हैराण देखील केले. अगदी कधी नव्हे ते सार्वजनिक गणेश मंडळ आपल्याला रिकामी दिसली.