कठोर नियमांच्या पार्श्वभुमीवर पाहा पेट्रोल-डिझेलचे दर

मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन वेळा कपात 

Updated: Apr 5, 2021, 09:26 AM IST
कठोर नियमांच्या पार्श्वभुमीवर पाहा पेट्रोल-डिझेलचे दर  title=

मुंबई : मार्च महिन्यात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Disel Price) दरात तीन वेळा कपात झाली. मार्च महिन्यात पेट्रोल 61 पैशांनी स्वस्त झालं आणि डिझेलचे दर 60 पैशांनी कमी झाले. आता सलग 6 दिवस किंमतीत कोणता बदल झाला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीचा परिणाम पाहायला मिळाल. कच्च्या तेलाची किंमत 71 डॉलर प्रति बॅरलवरुन खाली येऊन 64 डॉलर प्रति बॅरल झालीय. 

याआधी फेब्रुवारीमध्ये पेट्रोल-डिझेल 16 वेळा महाग झाले. पेट्रोल डिझेलचे दर आजही रेकॉर्डतोड उंचीवर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल मार्च महिन्यापासून 61 पैसे प्रति लीटर स्वस्त झालं. तर डिझेल 60 पैशांनी कमी झाले. दिल्लीमध्ये सलग 6 दिवस पेट्रोल 90.56 रुपये प्रति लीटरनी मिळत आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 96.98 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 90.77 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 92.58 रुपये प्रति लीटर आहे.