पवार vs पवार ! शरद पवार, अजित पवार यांच्या कार्यक्रमाला कुठे किती आमदार, वाचा एका क्लिकवर

Ajit Pawar NCP Meet: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं शक्तिप्रदर्शन, शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरवर बैठक तर अजित पवारांचा वांद्रेत मेळावा पाहा दोन्ही गटांकडे किती आमदार

राजीव कासले | Updated: Jul 5, 2023, 02:03 PM IST
पवार vs पवार ! शरद पवार, अजित पवार यांच्या कार्यक्रमाला कुठे किती आमदार, वाचा एका क्लिकवर title=

Sharad Pawar vs Ajit Pawar NCP Meet: अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट आज मुंबईत आपापली ताकद आजमावत आहेत. राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा आजचा दिवस ठरणार आहे. आज दोन्ही गट मुंबईत शक्तिप्रदर्शन करत आहेत. दोन्ही गटांनी बैठक, मेळाव्यासंदर्भात व्हिप जारी केलाय.  शरद पवार (Sharad Pawar) यांची आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक होत आहे. राज्यातले राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, पदाधिकारी सर्वांनाच या बैठकीला येण्याचं निमंत्रण आहे. अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनी आजचा अल्टिमेटम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे अजित पवारांनीही आजच मोठं शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार केलाय. आज अजित पवारांचा वांद्रे इथे एमईटीत भव्य मेळावा होतोय. आता अजित पवारांच्या मागे किती आमदारांचं बळ उभं राहतं आणि शरद पवारांच्या पाठिशी किती आमदार उपस्थित राहतात यावर राष्ट्रवादीची पुढील रणनीती ठरणार आहे. 

शरद पवार यांच्याबरोबर असलेले आमदार
राष्ट्रवादी काँग्रेसच्य 53 आमदारांपैकी 35 आमदार अजित पवारांबरोबर तर 18 आमदार शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. यात शरद पवार यांच्याबरोबर जयंत पाटील, अशोक पवार, रोहीत पवार, देवेंद्र भुयार अपक्ष आमदार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, चेतन तुपे , बाबाजानी दुर्रानी विधानपरिषद, बाळासाहेब पाटील, प्राजक्ता तनपुरे, सुमनताई आर आर पाटील याशिवाय खासदार श्रीनिवास पाटील,खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार फोजिया खान, खासदार अमोल कोल्हे उपस्थित आहेत.

अजीत पवार यांच्याबरोबर असलेले आमदार
प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ, नरहरी झीरवळ, बाबा आत्राम, रामराजे निंबाळकर, आदिती तटकरे, राजेश टोपे, शशिकांत शिंदे विधानपरिषद,  सचिन लंके, सुनील शेळके (मावळ ) , दिलीप मोहिते , शेखर निकम, संग्राम जगताप (नगर शहर ) , अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे, प्रकाश साळुंके, अमोल मिटकरी ( विधान परिषद ), विक्रम काळे ( विधान परिषद ), राजेश पाटील चंदगड विधानसभा, इद्रनिल नाईक, सतिश चव्हाण ( विधान परिषद )

निवडणूक आयोगाकडे धाव
शरद पवारांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीय. अजित पवारांसह 9 आमदारांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रात देण्यात आलीय. अशा प्रकरणाचा निवाडा करताना निवडणूक आयोग दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेत फैसला देतं. रामविलास पासवान यांच्या पक्षाची शकलं होतानाही, शिवसेनेच्या फुटीसंदर्भात निकाल देतानाही आयोगाने दोन्ही बाजू ऐकल्या होत्या.