धारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसलाही शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस आमदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातील माजी नगरसेवकांना पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आकाश नेटके | Updated: Aug 26, 2023, 11:23 AM IST
धारावीत काँग्रेसला मोठा धक्का; वर्षा गायकवाड यांच्या 4 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश title=

Maharashtra Politcis : मुंबईत काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. मुंबईत शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) काँग्रेसलाही खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडे पाचही नगरसेवकांनी राजीनामे सोपवले आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुष्पा कोळी (सायन), वाजिद कुरेशी (चांदिवली), बब्बू खान (धारावी), गंगा कुणाल माने (धारावी), भास्कर शेट्टी (धारावी), अशी राजीनामा दिलेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत. यातील चार नगरसेवक हे वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातील असल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या सर्व नगरसेवकांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चार वाजता ठाण्यात या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत राजीनामा देत असल्याची माहिती या माजी नगरसेवकांनी दिली आहे. तर दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गट सोडून आतापर्यंत 17 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.