राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, कोणाला मिळणार संधी?

महामंडळ वाटपानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे.  

Updated: Sep 18, 2018, 08:36 PM IST
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा, कोणाला मिळणार संधी? title=

मुंबई : महामंडळ वाटपानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच १० ऑक्टोबरला फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. 

सध्या भाजप शिवसेनामधील मंत्री वाटपानुसार आणि पांडुरंग फुंडकर यांच्या निधानामुळे भाजपाच्या मंत्रिपदाच्या एकूण चार जागा रिक्त आहेत. यापैकी सेनेचा १२ मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरणार का, की विलासराव देशमुखांप्रमाणे इच्छुकांना झुलवत ठेवण्याचं धोरण फडणवीस सरकार कायम ठेवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांचं या मंत्रीमंडळ विस्तारात कमबॅक होणार नसल्याचं समजतंय. तर कृषीमंत्रीपद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचं कळतंय. 

या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचं मंत्रिपद धोक्यात असू शकेल, पाहा?