विधानपरिषदेच्या १२ जागांचं भिजतं घोंगडं, महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा नाही

महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली.

Updated: Jul 30, 2020, 08:13 PM IST
विधानपरिषदेच्या १२ जागांचं भिजतं घोंगडं, महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा नाही title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या १२ जागांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. जून महिन्यामध्येच राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त झाल्या होत्या. या १२ जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी ४-४ सदस्य जातील, असं बोललं जातंय. पण या जागांवर कोणाला पाठवावं याबाबत महायुतीमध्ये अजूनही निर्णय झालेला नाही.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील एकूण १२ जागांसाठी असलेला कालावधी जूनच्या पहिल्या आठवड्यात संपला. या जागांसाठी असलेल्या निकषांवरती राज्यपाल आग्रही असल्याचं समजतंय.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वेळकाढूपणाविषयी शंका उपस्थित केली होती. ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाविकासआघाडीचे सरकार पडेल, अशी भाजप नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यपालनियुक्त सदस्यांची नियुक्ती लांबणीवर टाकण्यात आली आहे. एकदा का भाजपचे सरकार आले की, आपल्याला हव्या त्या लोकांची विधानपरिषदेवर वर्णी लावता येईल, असे मनसुबे भाजप रचत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. 

'महाविकासाघाडी'च्या समन्वय समितीची बैठक, या मुद्द्यांवर चर्चा