मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर, हार्बरच्या नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक आहे.

Updated: Jul 2, 2017, 11:09 AM IST
मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई : मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर आज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर, हार्बरच्या नेरूळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक आहे.

पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीममध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून या ब्लॉकमुळे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.