Maharashtra Unseasonal Rains | राज्यात या जिल्ह्यांवर अवकाळीचं संकट, हवामान खात्याचा अंदाज

याआधीच अवकाळीमुळे बळीराजा कोलमडून पडलाय. आता पुन्हा अवकाळीनं धुमाकूळ घातला तर शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.  

Updated: Feb 17, 2022, 10:25 PM IST
Maharashtra Unseasonal Rains | राज्यात या जिल्ह्यांवर अवकाळीचं संकट, हवामान खात्याचा अंदाज  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वांरवार होणाऱ्या अवकाळीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं. आता पुन्हा अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकरी राजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. (meteorological department forecasts unseasonal rains on 19 and 20 february in vidarbha and marathwada)

विदर्भ आणि मराठवाड्यात 19 आणि 20 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने नक्की कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचं सांगितलंय हे आपण जाणून घेऊयात. 

मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

त्यामुळे रब्बी हंगामाला पुन्हा फटका बसण्याची शक्यता आहे. याआधीच अवकाळीमुळे बळीराजा कोलमडून पडलाय. आता पुन्हा अवकाळीनं धुमाकूळ घातला तर शेतकरी पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.