म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर

मुंबईतल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणा-यांसाठी खूषखबर....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 18, 2017, 06:46 PM IST
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर  title=

मुंबई : मुंबईतल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणा-यांसाठी खूषखबर....

म्हाडानं अर्ज करण्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढवलीय. म्हाडाच्या घरांसाठी आता 24 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी दि. २३ ऑक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत करता येणार आहे. 

नोंदणीकृत अर्जदाराला नोंदणीतल्या माहितीत २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत बदल करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज दि. २४ ऑक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत सादर करता येणार आहे.

या व्यतिरिक्त दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदनिका सोडतीच्या जाहिरातीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.