मीरा-भाईंदरमध्ये भाजपला एकहाती सत्ता

महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड मीरा-भाईंदरमध्येही बघायला मिळाली. भाजपने मीरा-भाईंदर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलंय. ९५ पैकी ५४ जागा भाजपने मिळवल्या आहेत.

Updated: Aug 21, 2017, 04:38 PM IST
मीरा-भाईंदरमध्ये भाजपला एकहाती सत्ता title=

भाईंदर : महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड मीरा-भाईंदरमध्येही बघायला मिळाली. भाजपने मीरा-भाईंदर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलंय. ९५ पैकी ६१ जागा भाजपने मिळवल्या आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचा गढ मानल्या जाणा-या या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाहीये. 

तर शिवसेनेच्या जागा थोड्या वाढल्या आहेत. भाजपनं बहुमत मिळवल्याने शिवसेनेला आता विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे. मनसेला आणि बहुजन विकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसला १० जागांचा फटका बसला आहे.

भाजप - ६१ 
शिवसेना - २२
कॉंग्रेस - १०
राष्ट्रवादी - ००
मनसे - ००
अपक्ष - ०२