राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे.  राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे. 

Updated: Feb 14, 2018, 08:40 PM IST
 राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार... title=

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे.  राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे. 

काय आहे कार्टुनमध्ये...

या व्यंग्यचित्राला‘थंडीतलं एक उबदार स्वप्न’असे टायटल देण्यात आले आहे. यात सरसंघचालक मोहन भागवत पलंगावर झोपले आहेत आणि ते एक उबदार स्वप्न पाहात आहेत. यात त्यांच्यासोबत संघात नव्याने सामील झालेला नवसंघिष्टांसोबत दिसत आहेत. भागवत म्हणतात, ‘क्या है रे तिकडे? चलो पलिकडे! दांडूका देखा नही क्या हमारा? एक एकको पुस्तक फेकके मारेगा! समजलं क्या?’

पाक लष्कर आणि दहशतवाद्यांची भंबेरी... 

 मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकताच त्यांना भीत पाक लष्कराचे अधिकारी आणि दहशतवाद्यांची भंबेरी उडते आणि ते म्हणतात, ‘भागो भागवत आया’ तसेच या व्यंगचित्रात मोहन भागवत यांच्या जवळ संघ विचार, बौद्धिक, चिंतन असे लिहिलेली पुस्तके पडली आहेत. मोहन भागवत यांच्या हिंदी भाषेची टरही या व्यंगचित्रात उडवण्यात आली आहे.

 

विरोधक आक्रमक 

 मोहन भागवत यांच्या लष्करासंदर्भातल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोहन भागवतांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली होती. तर राष्ट्रवादीनेही मोहन भागवत यांचा निषेध करत त्यांच्याविरोधात आंदोलन केले. तसेच मोहन भागवत यांनी माफी मागितली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. 

राज ठाकरेंचा वेगळ्या पद्धतीने निषेध 

नेहमी आपल्या ठाकरे शैलीने उत्तर देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता गेल्या काही दिवसांपासून मोदी, अमित शहा आणि आता संघाला व्यंग्यचित्रातून लक्ष्य केले आहे.