शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, उद्धव यांच्यासमोर मोदी-मोदीचे नारे

जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यासाठी आले होते तेव्हा त्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड घोषणाबाजी पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोर-चोरच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचं बोललं जातंय.

Updated: Jul 5, 2017, 01:51 PM IST
शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, उद्धव यांच्यासमोर मोदी-मोदीचे नारे title=

मुंबई : जीएसटी लागू झाल्यामुळे जकातीच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यासाठी आले होते तेव्हा त्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड घोषणाबाजी पाहायला मिळाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोर-चोरच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचं बोललं जातंय.

जकातीतून पालिकेला सर्वाधिक महसूल मिऴत होता. दरवर्षी सात हजार कोटीहून अधिक उत्पन्न जकातीतून मिळत होतं. त्यात दरवर्षी पाच ते आठ टक्क्यांची वाढ होत होती. त्यामुळं जकात बंद झाल्यावर पालिकेला कायमस्वरुपी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.