मुंबई : एअर इंडिया तोट्यात आहे हे खरं आहे. मात्र ही सेवा विदेशातील कंपनीला देऊ नये, असं सांगत एअर इंडियाच्या खाजगिकरणावर सरसंघचालकांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच देशात सर्व व्यवस्था कॅशलेस करू शकणार नाही, असं सांगत मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेला एकप्रकारे फटकारले आहे. मुंबई शेअर बाजारात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रम ते बोलत होते.
अशी वक्तव्य करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केंद्र सरकारला विशेषतः पंतप्रधान मोदींना फटकारलंय. एअर इंडिया तोट्यात असली तरी ही सेवा परदेशी कंपनीला देऊ नये... कधीही आपल्या देशावरील आकाश हे दुसऱ्या कोणाकडे देऊ नये, असं सांगत एअर इंडियाच्या खाजगीकरणावर स्वतःची भूमिका स्पष्ट केलीय.
तसंच देशात सर्व व्यवस्था कॅशलेस करू शकणार नाही. कारण मोठा समाज या व्यवस्थेबाहेर आहे, तो आता हे शिकण्याच्या मनस्थितीत नाही. तेव्हा संपूर्ण कॅशलेस करण्यापेक्षा लेस कॅशलेस केलं पाहिजे, असं सांगत पंतप्रधान मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेला एकप्रकारे फटकारलंय.