सहा दिवसानंतरही मोनो रेल ठप्प

गेल्या गुरुवारी मोनो रेलच्या एका डब्ब्याला आग लागली होती. 

Updated: Nov 14, 2017, 06:45 PM IST
सहा दिवसानंतरही मोनो रेल ठप्प

मुंबई : गेल्या गुरुवारी मोनो रेलच्या एका डब्ब्याला आग लागली होती. तेव्हापासून ठप्प झालेली मोनोरेलची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. यामुळे मोनोरेलने प्रवास करणा-या प्रवाशांचे हाल होतायत. तर मोनोचंही आर्थिक नुकसान होतंय.

जळालेला मोनोरेलचा डब्बा काढण्यात आला असला तरी मोनोरेल कधीसुरु होणार हे न मोनो प्रशासन सांगतंय, न एमएमआरडीए. त्यामुळे आता मोनोचा दुसरा टप्पा रखडण्याची शक्यता आहे.