मुंबईत तुमचाही मोबाईल, सोनं हरवलंय? 'बेस्ट'कडून यादी जाहीर, चेक करा तुमचं आहे का

Mumbai Best: सप्टेंबर महिन्यात बेस्ट बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी समोर आली आहे. बेस्ट विभागाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील अपडेट दिली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 13, 2023, 12:01 PM IST
मुंबईत तुमचाही मोबाईल, सोनं हरवलंय? 'बेस्ट'कडून यादी जाहीर, चेक करा तुमचं आहे का title=

Mumbai BEST Recovered Lost Mobile: बेस्टमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. बेस्टमधील प्रवासादरम्यान तुमचा किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा मोबाईल हरवला आहे का? तर हरवलेला मोबाईल परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण बेस्ट प्रशासनाने बसमध्ये हरवलेल्या मोबाईलची यादी जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात बेस्ट बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी समोर आली आहे. बेस्ट विभागाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील अपडेट दिली आहे. 

तुमचा हरवलेला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी काही महत्वाचे दस्तावेज सोबत आणावे लागतील. याचा तपशील जामून घेऊया. तुम्ही राहत असल्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट यापैकी एक पुरावा सोबत आणावा लागेल. 

मोबाईल परत मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र

मोबाईलचे बिल किंवा कॅश मेमो 

सिम कार्ड कंपनीकडून डिटेल्सचा तपशील

मोबाईल हरवल्याची पोलिसांत तक्रार केल्याची एनसी कॉपी 

हे कागदपत्र सोबत आणलेल्या नागरिकांना सोबत आणलेली कागदपत्र दाखवून आपल्या मोबाईलची ओळख पटवावी लागेल. 

मुंबईत वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढणार? कोणी काळजी घेण्याची गरज? जाणून घ्या

इतर मौल्यवान वस्तू

कॅश, सोने, चांदी, मोती, हिरा अशा मौल्यवान वस्तू हरवल्या असतील आणि त्यासाठी दावा करायचा असेल तर आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घ्या. 

मुंबई/उपनगरियचे आयडी आणि निवासाचा पत्ता (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.) 

पोलीस एनसी/एफआयआरची कॉपी 

कॅश मेमो/मौल्यवान वस्तूंचे बिल

परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 10 हजाराची लाच, मुंबई विद्यापीठात धक्कादायक प्रकार

मुंबईकरांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ

मागील दोन ते तीन दिवसांपासून सकाळच्या वेळी मुंबईत वातावरण धुसर असून, दृश्यमानताही कमालीची कमी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनीच या परिस्थितीला धुक्याचं चादर म्हटलं. पण, या धुक्यात कुठंच थंडीचा लवलेषही नव्हता. शुक्रवारीसुद्धा शहरात अशीच परिस्थिती असून, सर्वत्र धुसर वातावरण पाहायला मिळत आहे. मुळात मुंबईत असणारं हे धुकं हिवाळ्याआधीची चाहूल नसून, हे धुरकं आहे. 

इंग्रजीत Smog अर्थात Smoke आणि Fog यांचं हे मिश्रण. मराठीत धूळ आणि धुक्याच्या मिश्रणाला धुरकं असं संबोधतात. वाऱ्याचा वेग जेव्हा अपेक्षेहून जास्त मंदावतो तेव्हा हवेत मुळातच असणारे धुलिकण दीर्घ काळासाठी एकाच ठिकाणी तरंगत राहतात. त्यांना पुढे जाण्यासाठी वाव नसल्यामुळं त्यांची एकाच ठिकाणी दाटी होते आणि यातून ही परिस्थिती उद्भवते.