'बेस्ट' डेपोत धांगडधिंगा, १२ जणांची विभागीय चौकशी सुरु

बेस्टच्या वडाळा डेपोमधील हिडीस डान्स प्रकरणी विभागीय चौकशी सुरु झाली आहे. चौकशीसाठी वरळी बेस्ट डेपोचे उप व्यवस्थापक एन. आर. जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Updated: Nov 9, 2017, 05:17 PM IST
'बेस्ट' डेपोत धांगडधिंगा, १२ जणांची विभागीय चौकशी सुरु title=

कृष्णात पाटील / सुनील घुमे, मुंबई : बेस्टच्या वडाळा डेपोमधील हिडीस डान्स प्रकरणी विभागीय चौकशी सुरु झाली आहे. चौकशीसाठी वरळी बेस्ट डेपोचे उप व्यवस्थापक एन. आर. जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, याचा धक्कादायक व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला. हा व्हिडिओ दाखविण्यात आल्यानंतर खुलेआम नोटांची उधळपट्टी करणाऱ्या बेस्टच्या या १२ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे.  

बेस्ट अधिकाऱ्यांनी कसा धांगडधिंगा घातला, त्याची धक्कादायक व्हिडिओ क्लीप झी २४तासने सर्वात आधी दाखवली होती. बेस्टमध्ये कामाला असलेली अभिनेत्री माधवी जुवेकर हिडीस डान्स करतेय आणि बेस्टचे अधिकारी तिच्यावर नोटा उधळतायत, असा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 

यासंदर्भात याआधीच बेस्टचे उप दक्षता आणि सुरक्षा अधिकारी इंदूलकर यांनी आपला अहवाल सादर केलाय. त्या अहवालाच्या आधारे अभिनेत्री माधवी जुवेकरसह एकूण १२ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिलेत. त्याबाबतच्या आदेशाची प्रत झी २४ तासकडं आहे.

या १२ अधिकाऱ्यांची चौकशी  

1) ए. बी. शिंदे - असि. इंजिनिअर,
2) यू. एस. कोनकर - चार्ज इंजिनिअर
3) पी. डी. कांबळी - एएओ,
4) एस. एस. पवार - सुपरवायझर
5) पी.पी.लोके ऊर्फ माधवी जुवेकर - क्लार्क
6) एस.एम.सावंत - सुपरवायझर
7) ए. आर. राणे - क्लार्क,
8) डी. के. पिंजारी - सुपरवायझर
9) एस. एन. गरूड - निरीक्षक,
10) एस. आर. महाडिक - मीटर इन्स्पेक्टर
11) के. व्ही. निकाळजे, मीटर इन्स्पेक्टर (ज्यु.),
12) एस. व्ही. आवटे - शॉप रेकॉर्डर