...आता अंतर्वस्त्र डिस्प्ले केली तर खबरदार

मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Updated: Jun 15, 2019, 07:03 PM IST
...आता अंतर्वस्त्र डिस्प्ले केली तर खबरदार title=

मुंबई : मुंबईतील पदपथांवर यापुढे महिलांचे अंतर्वस्त्र पुतळ्यांना घालून त्यांची विक्री करता येणार नसल्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. अंतवर्स्त्रांच्या दुकानाबाहेर मेनेक्विन म्हणजे प्लास्टिकच्या पुतळ्यांना घातलेली महिलांची अंतर्वस्त्र यापुढे अजिबात दिसणार नाही. 

केवळ मुंबईच नव्हे तर प्रत्येक शहरात पदपथांवर महिलांच्या अंतवर्स्त्रांचे बीभत्स प्रदर्शन सुरू असते. मात्र यापुढे अशाप्रकारे महिलांच्या अंतवर्स्त्रांची जाहिरात आणि विक्री करता येणार नाही, असा आदेशच मुंबई महापालिकेने काढला आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे २०१३ पासून याविरोधात आवाज उठवत होत्या. अखेर सात वर्षांनी त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

केवळ पदपथांवरच नव्हे, तर अगदी मोठमोठ्या शॉपिंग मॉल्समध्येही मेनेक्विनचे असे ओंगळवाणे जाहीर अंगप्रदर्शन सुरू होते. महापालिकेच्या आदेशामुळे या प्रकाराला आता चाप लागणार आहे. त्यामुळे महिलांची होणारी कुचंबणा काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंतवर्स्त्र प्रदर्शनावरची ही बंदी योग्यच म्हणावी लागेल.