घराबाहेर पडण्याआधीच लोकलचं वेळापत्रक पाहा, कुठे आणि कधीपर्यंत असणार मेगाब्लॉक

रविवारी घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची

Updated: Jun 18, 2022, 10:18 AM IST
घराबाहेर पडण्याआधीच लोकलचं वेळापत्रक पाहा, कुठे आणि कधीपर्यंत असणार मेगाब्लॉक title=

मुंबई : तुम्ही जर रविवारी बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गैरसोय होऊ शकते. टाइम टेबल पाहून तुम्ही घराबाहेर पडावं. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. 

मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे - कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 9ते दुपारी 1 पर्यंत मेगाब्लॉक आहे. या काळात काही एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग वळवण्यात येतील. मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने अपेक्षित आहेत. 

कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी4.10 पर्यंत ब्लॉक असेल. या वेळेत सीएसएमटीकडे जाणा-या अप हार्बर मार्गावरची सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 

वाशी-बेलापूर-पनवेल मार्गावर सकाळी 10.16  ते दुपारी 3.47 पर्यंत ब्लॉक असणार आहे. हार्बर लाईनवरील प्रवाशांना ठाणे-वाशी-नेरुळवरून सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.