मुंबई: नेरोलॅक पेंट्स कंपनीच्या गोदामाला भीषण आग

गेल्या काही काळापासून मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत. 

Updated: Aug 13, 2018, 10:17 AM IST
मुंबई: नेरोलॅक पेंट्स कंपनीच्या गोदामाला भीषण आग title=
संग्रहित प्रतिमा

मुंबई: आताची सर्वात महत्वाची बातमी. मुंबईत वरळीच्या गणपतराव कदम मार्गावर भीषण आग लागली आहे. नेरोलॅक पेंट्स या कंपनीच्या गोदामाला ही आग लागली असून घटनास्थळी १० अग्निशमन बंब दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आगीची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थिचे प्रयत्न करत आहेत. गेल्या काही काळापासून मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..