Mumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी

Mumbai News : मुंबईत घर घ्यायच्या विचारात असाल तर आधी वाचून घ्या ही माहिती. एका क्लिकवर येईल शहरातील सध्याचे Housing Rates  

सायली पाटील | Updated: Mar 5, 2024, 03:22 PM IST
Mumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी  title=
Mumbai News city people demands for 2 BHK houses one and a half lakh houses were sold last year

Mumbai Housing News : 'एक अकेला इस शहर मे...' हे गाणं आठवतंय का तुम्हाला? आठवत असेल तर उत्तम आणि नसेल आठवत तरीही ठीक. या मुंबई शहरामध्ये दर दिवशी अनेक नवे चेहरे येतात. कैक चेहरे या शहरात स्वत:ची ओळख शोधण्यासाठी येतात तर, काही मंडळींचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे या शहरात स्वत:चं घर शोधण्यासाठीच्या प्रयत्नांचा. मुंबईच्या सीमा मागील काही वर्षांमध्ये इतक्या विस्तारल्या की या शहराची व्याप्ती झपाट्यानं वाढली. पाहता पाहता या शहरात घर घेऊ पाहणाऱ्यांचा आकडाही वाढला. 
 
अर्थव्यवस्थेला मिळालेली समाधानकारक बळकटी, नागरिकांच्या अर्थार्जनामध्ये झालेली वाढ, शहरातील अनेक वस्त्यांचा पुनर्विकास या आणि अशा अनेक कारणांमुळं 10 *10 च्या खोलीतच राहणारा मुंबईत 1 बीएचके आणि आता आता तर 2 बीएचकेच्या घरात पोहोचला आहे. 

वर्षभरात शहरात दीड लाखांहून अधिक घरांची विक्री 

मुंबईसह महामुंबई परिसरामध्ये 2023 या वर्षामध्ये दीड लाखांहून अधिक घरांची विक्री झाली. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये सर्वाधिक पसंती म्हणजे 42 टक्के भाग हा 2BHK घरांचा होता. नव्या वर्षात म्हणजेच 2024 मध्येही हेच चित्र पाहायला मिळत आहे. काळानुरूप आता वन रुम किचनची संस्कृती मागे पडत असून, घरात प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची जागा हवी या गरजेतून आता 2बीएचकेसाठीच अनेकजण पुढे सरसावताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : Women's day 2024 : मैत्रिणींनो भारतातील 'ही' ठिकाणं फिरण्यासाठी बेस्ट आणि सुरक्षित

थोडक्यात काय, तर शहरातील अनेक पुनर्विकास प्रकल्पांमध्येही विकासकांना 1RK आणि 1BHK ऐवजी 2BHK घरांचा प्रस्ताव मान्य करावा लागत आहे. शहरात सध्याच्या घडीला पश्चिम उपनगरांमध्ये घरांच्या चढ्या किमती पाहायला मिळत असून तेथील घरांना सर्वाधिक मागणीही दिसून येत आहे. 

शहरातील कोणत्या भागात काय आहेत घरांच्या किमती? 

मुंबई शहर (मुख्य), पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर अशा विविध भागांमध्ये घरांच्या विविध किमती पाहायला मिळत आहेत. मुख्य मुंबई शहर आणि शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये साधारण 650 ते 700 चौरस फुटांच्या घराचे दर दीड कोटी आणि त्याहून जास्त आहेत. पश्चिम उपनगरांमध्ये हे दर 2 बीएचके घरासाठी 75 लाख आणि त्याहून पुढे आहेत. तुलनेनं पूर्व उपनगरांमध्ये मात्र या किमती काहीशा कमी आढळून येत आहेत. इथं घरांच्या किमती 55 लाखांच्या घरात आहेत. 

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच शहरामध्ये मोठ्या क्षेत्रफळाच्या घरांकडे अनेकांचा कल दिसून आला. यंदा शहरात साधारण 400 हून अधिक गृहनिर्माण प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी सज्ज असून यामध्ये 2BHK घरांची संख्या निर्विवादपणे जास्त आहे हे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.