Mumbai News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी! राखीव साठा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय

BMC Water Supply News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाणीबाणीचं संकटाबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 1, 2024, 09:54 AM IST
Mumbai News  : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी! राखीव साठा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय title=
Mumbai News Important news about water for Mumbaikars A big decision of the state government in view of the reserves

BMC Water Supply News : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीकपातीच टांगती तलवार लटकली असताना राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सात धरणातील पाणीसाठी कमी झाल्यामुळे संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्याचा विचारात मुंबई महापालिका होती. पण राज्य सरकारने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकाराने राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी दिल्यामुळे तुर्तास मुंबईत पाणी कपात करण्याची गरज नाही, असं पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं आहे. (Mumbai News Important news about water for Mumbaikars A big decision of the state government in view of the reserves)

मुंबईकरांची तहान तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणातून होतो. यामधील तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा ही पाच धरणांचा कारभार हा मुंबई महानगरपालिका पाहत असते. तर भातसा आणि अप्पर वैतरणा याचा निर्णय हा राज्य सरकारचा असतो. ज्यावेळी या दोन धरणाचे बांधकाम झाले तेव्हा भांडवली खर्चात मुंबई महानगरपालिकेने मदत केल्यामुळे यातून मुंबईला पाणी मिळते. गेल्यावर्षी 7 धरणाचा पाणीसाठा हा साठा 55 टक्के इतका होतो. तर यंदा केवळ 43 टक्के इतकाच शिल्लक असल्याने पाणी कपातीचं संकट उभं ठाकल होत. 

1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणीकपातीचं टेन्शन ओढवलं होतं. राज्य सरकारच्या निर्णयामुळे तुर्तास हे संकट टळलं असून मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दरम्यान, 10 टक्के पाणीकपात जरी टळली असली तरी पिसेमधील उदंचन केंद्रात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत सध्या 15 टक्के पाणी कपात सुरु असून ही  5 मार्चपर्यंत असणार आहे.