धोका वाढतोय! प्रत्येक चौथा मुंबईकर 'या' शारीरिक व्याधीनं ग्रस्त

Mumbai People Health News : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचं आरोग्याकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष होताना दिसत आहे. एका निरीक्षणातून समोर आलेली आकडेवारी सावध करणारी.   

सायली पाटील | Updated: Sep 30, 2023, 12:30 PM IST
धोका वाढतोय! प्रत्येक चौथा मुंबईकर 'या' शारीरिक व्याधीनं ग्रस्त title=
Mumbai people at high risk of diabetes

Mumbai People Health News : मुंबई, एक असं शहर जिथं प्रत्येकजण सतत काही न काही कारणानं व्यग्र असतो. अशा या अतिशय Busy शहराची दिवसागणिक प्रगती होत असतानाच दुसरीकडे आरोग्याच्या बाबतीत मात्र शहराची अधोगती होताना दिसत आहे. कारण, एका शारीरिक व्याधीनं शहरातील नागरिकांना ग्रासल्याचं आता एका अहवालातून समोर आलं आहे. 

धास्ती आरोग्याची... 

मुंबईकरांना आता आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन करण्यात येत आहे. कारण, शहरातील नागरिकांना मधुमेह म्हणजेच डायबिटीसचा विळखा बसताना दिसतोय. नुकतंच एका सर्व्हेमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिथं शहरातील 4 पैकी एका तरुणाच्या साखरेचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. 

सर्व्हेक्षणासाठी मुंबईत 10 हजार नागरिकांची मधुमेह चाचणी करण्यात आली. ज्यामधून हा धक्कादायक अहवाल समोर आला. बदललेली जीवनशैली, वेळेत न जेवणे, फास्टफूडचं अतिसेवन करणे, सातत्याने एकाच ठिकाणी बसणे यामुळे मुंबईकरांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढलं. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी हाच निष्कर्ष निघाला. 

मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी काय करावं? 

  • तळलेले पदार्थ, फास्ट फूडचं सेवन करू नये
  • आरोग्यपूर्ण आहाराचं सेवन करावं
  • ग्लुकोजवर नियंत्रण ठेवावं
  • आजारी पडलात तर स्वत:ची काळजी घ्या
  • गरजेप्रमाणे डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या

हेसुद्धा वाचा : Mumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास.... 

ज्यांनी स्वतःची चाचणी घेतली त्यापैकी 50% पेक्षा जास्त लोक 20-40 वयोगटातील होते, 41% 40-60 वयोगटातील होते आणि जवळजवळ 50 टक्केपेक्षा जास्त लोक 20 ते 40 वयोगटातील होते. 41% टक्के लोक 40 ते 60 वयोगटातील होते, तर, उर्वरित 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. 25% तरुणांमध्ये साखरेची पातळी बिघडली होती

अतिशय महत्त्वाच्या अशा या निरीक्षणामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोक 20 ते 40 वयोगटातील होते. तर, 41 टक्के लोक 40 ते 60 वयोगटातील होते आणि उर्वरित 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. यातील 25 टक्के तरुणांमध्ये साखरेची पातळी बिघडलेली आढळून आलीय.