रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे तरुणी बचावली

कॉन्सेटबल अमित कुमार यांच्या प्रसंगावनधानामुळे एका तरुणीचे प्राण वाचले. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2018, 11:49 AM IST
रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे तरुणी बचावली title=

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेट्रल स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दलाचे कॉन्सेटबल अमित कुमार यांच्या प्रसंगावधानामुळे एका तरुणीचे प्राण वाचले. 

चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न

30 वर्षीय मनिता पटेल बुधवारी मुंबई सेंट्रल स्टेशनवरून वसलाड एक्स्प्रेस पकडण्यासाठी धावल्या. पण चालती गाडी पकड्याच्या प्रयत्नात त्यांचा पाय निसटला.

हवालदाराने आधार दिला आणि...

पण क़ॉन्सेटबल अमित कुमार यांनी वेळीच त्यांना आधार दिल्यानं मनिता पटेल यांचा जीव वाचला. या प्रसंगावधानाबद्दल अमित कुमार यांचं कौतुक होत आहे.