शिवस्मारकाचं काम २४ ऑक्टोबरला सुरू होणार

शिवरायांच्या स्मारकाची उंची २१२ मीटर असून अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच स्मारक 

Updated: Oct 15, 2018, 06:41 PM IST
शिवस्मारकाचं काम २४ ऑक्टोबरला सुरू होणार title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील महाराजांच्या पुतळ्याच काम २४ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. एल अॅण्ड टी कंपनीला शिवस्मारकाचं कंत्राट देण्यात आल्याची माहीती समोर येतेयं. शिवस्मारक पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येतंय. शिवरायांच्या स्मारकाची उंची २१२ मीटर असून अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच स्मारक असणार आहे.

उंचीवरून वाद 

 उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे.

या कागदपत्रांवरून छत्रपतींच्या स्मारकाची उंची पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे.

मात्र प्रत्यक्ष पुतळ्याची उंची 44 मीटरने कमी करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीतील स्मारकाच्या सुधारित आराखड्यात पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढवण्यात आली आहे.

- पूर्वी पुतळ्याची उंची 160 मीटर होती, ती आता 126 मीटर करण्यात आली आहे

- पूर्वी चौथाऱ्याची उंची 30 मीटर होती, ती आता 84 मीटर करण्यात आली आहे. 

- पूर्वी स्मारकाची एकूण उंची 190 मीटर होती ती आता 210 मीटर करण्यात आली आहे

विधानसभेत पुतळ्याच्या उंचीवरून गोंधळ झाला होता. या स्मारकाच्या कामासाठी समुद्रात दोन टप्प्यात भराव करण्यात येणार आहे.

यात पहिल्या टप्प्यात 7.18 हेक्टरवर भराव टाकला जाणार आहे, तर दुसर्‍या टप्प्यात 5.97 हेक्टर क्षेत्रावर भराव टाकला जाणार आहे.

छत्रपतींच्या या स्मारकासाठी एकूण 3600 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.