'मी शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता'; 21 वर्षीय मुंबईकर तरुणीच्या दाव्याने खळबळ

Mumbai Woman Devastating Post: एखादी मजेदार रात्र ठरेल असं मला त्याच्याबरोबर बाहेर जाताना वाटलं होतं ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात क्लेशदायक अनुभव देणारी रात्र ठरली, असंही या तरुणीने म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 27, 2024, 06:12 AM IST
'मी शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता'; 21 वर्षीय मुंबईकर तरुणीच्या दाव्याने खळबळ title=
इन्स्टाग्राम पोस्टमुळे एकच खळबळ

Mumbai Woman Devastating Post: सोशल मीडियावरील ऑनलाइन मैत्रीच्या नावाखाली मुंबईमधील एका 21 वर्षीय तरुणीवर नशेच्या धुंदीत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या मित्रानेच या तरुणावर 13 जानेवारी रोजी बलात्कार केल्याचा दावा पीडितेने केला आहे. या प्रकरणाचा तपास आता दक्षिण मुंबईतील वरळी पोलीस करत आहे. 

भेट, मद्यपान अन् बलात्कार...

पीडित 21 वर्षीय तरुणीने तिच्याबरोबर घडलेला सर्वात धक्कादायक अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर केला आहे. हितिक शाहा नावाच्या तरुणाशी ज्या रात्री भेट घडली त्या रात्री नेमकं काय काय घडलं हे पीडितेने या पोस्टमधून सांगितलं आहे. केवळ इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीमधून एखादी रात्र या नव्या मित्रासोबत मज्जा मस्ती केल्यास अनेक दु:ख आणि चिंता दूर होतील असा विचार करुन ही तरुणी त्याला भेटयला गेली होती. मात्र त्यानंतर झालेलं मद्यपान, तिने हरपलेली शुद्ध अन् शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर बलात्कार होत असल्याची जाणीव असा सर्व घटनाक्रम या तरुणीने सोशल मीडियावरुन मांडला आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय...

मी 21 वर्षीय मुंबईकर मुलगी आहे आणि ही माझ्यासोबत घडलेली कहाणी आहे. मी इंस्टाग्रामवर ज्याच्याशी बोलत होते त्याच्याशी हँग आउट करण्याचा म्हणजेच बाहेर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. तशा आमच्या काही परस्पर ओळखी म्हणजेच कॉमन कनेक्शन होते सोशल मीडियावर. त्यामुळे  ही एखादी मजेदार रात्र ठरेल असं मला वाटलं होतं ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात क्लेशदायक अनुभव देणारी रात्र ठरली.

हितीक शाहा आणि मी शहरामध्ये ड्रिंक्स आणि पार्टीसाठी बाहेर पडलो होतो. आम्ही अमुक एका ठिकाणाहून सुरुवात केली. त्याच्या काही मित्रांना भेटल्यानंतर आम्ही 'बस्तियान'ला निघालो. काही टकीला शॉट्सनंतर मला झिंग चढली. मी पार्टीमध्ये असून मला एकटं वाटू लागलं. त्याने आग्रह धरला की मी अधिक थोडे मद्य घ्यावे. त्यानुसार मी अजून प्यायले. मात्र त्यानंतर ब्लॅकआउट एपिसोड झाला. म्हणजेच पुढे काय झाले ते मला आता आठवतही नाही. मला शंका आहे की मला अंमली पदार्थ देण्यात आले. मी सुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही तो माझ्यावर बलात्कार करत राहिला. संतापून त्याने मला तीन वेळा जोरदार फटकेही मारले. त्यामुळे मी घाबरुन गेले.

ती जागा त्याच्या मित्राची असल्याचे मला नंतर जाणवले. त्याच्या मित्रांनी त्याच्या संरक्षणासाठी आमच्या झटापटीत हस्तक्षेप केला. मी मदतीसाठी हाक मारण्यापूर्वीच त्याने मला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याने अगदी मला त्याच्या मित्रांच्या उपस्थितीत धमकावले. मी तिथून निघून गेल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मी माझ्या चुलत भावाला मला घेण्यासाठी बोलावलं. जखमा आणि दुखापत झाली असल्यामुळे, मी माझ्या पालकांना त्या रात्रीबद्दल काहीही सांगू शकले नाही.

जेव्हा माझ्या कुटुंबाला हे कळले तेव्हा ते चक्रावून गेले. त्या आठवड्यातच मी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. जे काही घडलं त्यानंतर त्याने सकाळी मागितलेल्या माफीचा माझ्यालेखी काहीही अर्थ नव्हता. सध्या तो फरार झाला आहे कारण त्याला माहित आहे की त्याने काय केले आहे. 12 दिवस उलटून गेले तरी त्याला अटक झालेली नाही. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

हितिक शहा (आरोपी) विरुद्ध आयपीसी कलम 376 (बलात्काराची शिक्षा) आणि 323 (स्वइच्छेने दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @punishmyrapist

मला न्याय हवा आहे. मी इतर मुलींना, तुम्ही कोणाशी बोलतात आणि कोणाशी बाहेर जातात याबद्दल अधिक सावध राहण्याची विनंती करते. मला मदत करू शकतील असे काही लिंक्स/सोर्सेस/सल्ला/कनेक्शन/एनजीओ तुमच्याकडे असतील तर मला मेसेज करा.